मागे जा (Back to Story)

वृत्तपत्र डिजिटल ई-पोस्टर

Branded E-Poster & PDF Viewer

कॉलम:
पार्श्वभूमी:
फोटोचे स्थान:

PCNNEWS

विभाग: Crime महाराष्ट्र 01/08/2026

भारती विद्यापीट पोलिसांकडून आरोपीस अटक

महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त

भारती विद्यापीट पो...

 भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर आरोपीकडुन १ पिस्टल व १ जिवंत काडतुस केले हस्तगत दिनांक २९/०७/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम भिलारेवाडी, महानंद डेअरीजवळ, पुणे येथे अग्नीशस्त्रासह थांबला आहे. त्याप्रमाणे लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे इसम नामे विशाल प्रल्हाद कलवले, वय २६ वर्षे, रा. महानंदा दुध डेअरी शेजारील, ज्ञानेश्वरी हाईटस, पहीला मजला, भिलारेवाडी, ता. हवेली, जि. पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व १०००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडुन गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं ३९३/२०२६, आर्म अँक्ट.क ३ सह २५ म.पो.का.कलम ३७ (१),(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री.मिलींद मोहीते, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, श्री,राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.
संपादकीय मंडळ / EDITOR

सतीश विलास जाधव

संपर्क व इमेल / CONTACT

Call: 9763100465

satishjadhav70575@gmail.com

Follow Us:

PCNNEWS

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क' https://pcnnews.online/public/index.php आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.