PCNNEWS
विभाग: Crime
महाराष्ट्र
04/08/2026
सिहंगड पोलिसांनी गुन्हेगाराकडून एक पिस्टल केले जप्त.
...
पुणे :सतीश जाधव
सिंहगडरोड पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले जप्त.
तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर पोलीस स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विनायक मोहिते, सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी दादया घोलप याच्याकडे एक गावठी पिस्टल असुन तो इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा समोरील नवीन डीपी रोड कल्पतरु ब्लॅसम सोसायटीचे लेबर कॅम्प जवळ सनसिटीरोड पुणे येथे थांबलेला असुन त्याने अंगात पांढ-या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट घातली आहे अशी खाञीशीर बातमी मिळताच बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचा इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसुन आल्याने त्यास त्यास वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन पोउपनि संतोष भांडवलकर यांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता यश उर्फ दादया कमलाकर घोलप वय- १८ वर्षे रा. आझाद मिञ मंडळ जवळ, चरवडवस्ती वडगाव बु पुणे. व गावडे बिल्डींग दिघे टॉवर समोर जाधवनगर वडगाव बु पुणे असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी येण्याचे व कारण विचारले असता त्यांने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची खात्री झाल्याने लागलीच पंचासमधक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ४०,००० रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व १००० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचेवर सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे आर्म अंक्ट गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत. कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, .पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३,पुणे डॉ.सागर कवडे, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, संदिप कांबळे, समीर माळवदकर, तानाजी सागर, शिरीष गावडे यांचे पथकाने केली आहे.