मागे जा (Back to Story)

वृत्तपत्र डिजिटल ई-पोस्टर

Branded E-Poster & PDF Viewer

कॉलम:
पार्श्वभूमी:
फोटोचे स्थान:

PCNNEWS

विभाग: Crime महाराष्ट्र 03/08/2026

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त

खुनासारख्या गंभीर ...

पुणे : सतीश जाधव  युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर खुनासारख्या गंभीर गुन्हयातील २ पाहिजे आरोपी व २ पाहिजे विधिसंघर्षित बालकांना केले जेरबंद. दिनांक ३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पर्वती पोलीस स्टेशन कडील गु.र.नं २५१/२०२६  मधील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानांद कायगुडे, महेश मंडलिक व संदीप शिर्के यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे हिंगणे चौक सिंहगड व पद्मावती भागात फिरत आहेत. सदरची मिळालेली गोपनिय बातमी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी  पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हिंगणे चौक सिंहगड व पदमावती येथे जावुन तपास करुन गुन्हयातील आरोपी सुजित सोमनाथ धुतावळे वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द पुणे,आशिष राजू सोनवणे वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे यांना सिंहगड रोड हिंगणे चौक येथुन व  दोन विधीसंघर्षित बालकांना पद्मावती पुणे येथुन ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकामी पर्वती पोलीस स्टेशन येथे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे  तेजस्वी सातुपते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे  गौहर हसन, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक युनिट २ गुन्हे शाखा राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार, शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, महेश मंडलिक, संदीप शिर्के, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, नागनाथ राख, कुंदन शिंदे, आशिष यादव, संजय आबनावे, शंकर कुंभार, विजय पवार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, विदया शिंदे, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.
संपादकीय मंडळ / EDITOR

सतीश विलास जाधव

संपर्क व इमेल / CONTACT

Call: 9763100465

satishjadhav70575@gmail.com

Follow Us:

PCNNEWS

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क' https://pcnnews.online/public/index.php आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.