Loading date...

लेखनी नव्हे तर शस्त्र

PCNNEWS

www.pcnnews.news
ब्रेकिंग न्यूज
Crime Breaking

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

03 Aug 2026 | 17 वाचन

महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त

Article Inline Banner (728x90)

पुणे : सतीश जाधव 

युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर खुनासारख्या गंभीर गुन्हयातील २ पाहिजे आरोपी व २ पाहिजे विधिसंघर्षित बालकांना केले जेरबंद.

दिनांक ३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पर्वती पोलीस स्टेशन कडील गु.र.नं २५१/२०२६  मधील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानांद कायगुडे, महेश मंडलिक व संदीप शिर्के यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे हिंगणे चौक सिंहगड व पद्मावती भागात फिरत आहेत. सदरची मिळालेली गोपनिय बातमी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी  पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हिंगणे चौक सिंहगड व पदमावती येथे जावुन तपास करुन गुन्हयातील आरोपी सुजित सोमनाथ धुतावळे वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द पुणे,आशिष राजू सोनवणे वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे यांना सिंहगड रोड हिंगणे चौक येथुन व  दोन विधीसंघर्षित बालकांना पद्मावती पुणे येथुन ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकामी पर्वती पोलीस स्टेशन येथे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे  तेजस्वी सातुपते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे  गौहर हसन, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक युनिट २ गुन्हे शाखा राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार, शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, महेश मंडलिक, संदीप शिर्के, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, नागनाथ राख, कुंदन शिंदे, आशिष यादव, संजय आबनावे, शंकर कुंभार, विजय पवार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, विदया शिंदे, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या (Related News)

वाचक प्रतिक्रिया (Comments - 0)

या बातमीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवा!

आपली प्रतिक्रिया नोंदवा (Leave a Comment):

टीप: आपली प्रतिक्रिया संपादकांच्या मंजुरीनंतरच प्रकाशित होईल.