पिस्तूल जवळ बाळगणारा सराईत पर्वती पोलिसांच्या जाळ्यात.
महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त
पुणे :सतीश जाधव
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्तुल बाळगणा-या सराईत आरोपीस अटक करुन १ देशी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुस केले जप्त.
दि 30 रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक किरण पवार व पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी क्षितिज काळुराम मोहोळ,वय १९ वर्षे, रा. स.नं. २१४, मांगिरबाब चौकाजवळ, दांडेकर पुल पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण अंदाजे ४१,००० रु .चे १ देशी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-२ मिलिंद मोहिते, सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट . गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली व पर्वती पोलीस स्टेशन .राजेंद्र सहाणे, पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सुर्या जाधव व गणेश तरंगे यांनी केली आहे.

