मुंढवा पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तक्रारर दारांना मोबाईल परत मिळवून दिले.
पुणे : सतीश जाधव
मुंढवा पोलीस स्टेशनं सिअअर शहर पोर्टरवरील तक्रारीची दखल घेवुन विविध कंपनीचे १० मोबाईल फोन केले हस्तगत
भारत सरकार यांनी नागरीकांचे हरविलेले मोबाईल फोन परत मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेले पोर्टलमध्ये सन २०२५ व २०२६ मध्ये मुंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील नागरिकांचे हरविलेले मोबाईल फोनचा तपास होणेकामी तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद साळुंके यांनी सदर मोबाईल फोनचे आयईआयएमआय नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन सदर मोबाईलची माहिती प्राप्त करुन त्याव्दारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांना माहिती सादर केली. सदर माहितीचे आधारे विविध राज्यातील पोलीस स्टेशनला सदरबाबत माहिती सादर करुन त्याबाबत माहितीचा वेळेत पाठपुरावाकरुन तक्रारदार यांचे हरविलेले अंदाजे १,९०,००० रु.किं.चे विविध कंपनीचे एकुण १० मोबाईल फोन हस्तगत करुन वरिष्ठांच्या आदेशाने तक्रारदार यांना परत देण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुणे मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ पुणे जीवन बेनिवाल, सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांचे सुचनांप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, रुपेश तोडेवर, सचिन बोराटे यांनी केली आहे.

