Loading date...

लेखनी नव्हे तर शस्त्र

PCNNEWS

www.pcnnews.news
ब्रेकिंग न्यूज
Crime Breaking

रात्रीच्या वेळी फटका बुलेट ...सायलेन्सर वाजवून दहशत निर्माण करणारे गजाआड.

05 Aug 2026 | 36 वाचन

महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त

Article Inline Banner (728x90)

पुणे :सतीश जाधव 

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्यरात्री फटाका बुलेट सायलेन्सर वाजवून दहशत निर्माण करणा-या दुचाकीस्वरांविरुध्द गुन्हा दाखल

करून गुन्ह्यातील दुचाकी केल्या जप्त”   रात्री २.ते २.३० वा.सुमा.रिगालीया सोसायटी धानोरी पुणे येथे रस्त्यावर काही तरुणांनी बुलेट गाड्यांचे तसेच अन्य मोटार सायकलच्या सायलेंन्सरचा मोठ मोठयाने फटाक्या सारख्या कर्णकर्कश आवाज करून दहशत निर्माण करत धोकादायक पध्दतीने गाडया चालविलेच्या रिल्स सोशल मिडीयावर व्हायरल होत होत्या त्याबाबत परिसरातील नागरीकांनी रात्री परिसरात दहशतीचे व भितीदायक वातावरण निर्माण झाले बाबत पोलीस ठाणेस फोन करून तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करणेसाठी तपास पथकाचे पोलीस अंमलदार व बीट मार्शलचे अंमलदार यांनी गोपनिय बातमीदाराच्या मार्फत फटाका बुलेट सायलेन्सरचा आवाज करत दहशत निर्माण करणा-या  बुलेट,केटीएम व  स्प्लेंडर अशा मोटार सायकली व त्यावरील इसमांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन    मोटार वाहन कायदा . गुन्हा दाखल केलेला आहे. इसंमांची नावे  आशिष अशोक शिंदे वय २१ वर्षे रा लेन नं ९, निंबाळकरनगर, लोहगाव पुणे,)गुरुपितसिंग कर्नलसिंग कंबोज वय २१ वर्षे, रा. लेन नं. ९, निंबाळकरनगर, लोहगाव पुणे,संजय मुकेश सरवदे वय २० वर्षे,रा. भिमनगर विश्रांतवाडी पुणे,गौरव लक्ष्मण मस्के वय २० वर्षे, रा.मस्केवस्ती, विश्रांतवाडी पुणे, एक विधीसंघर्षित बालक संदर वाहन चालकांच्या एकुण ४ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.  सदर मोटार सायकल यांचे कर्णकर्कश फटाका सायलेंन्सर काढुन नष्ट केलेले आहेत. असा एकुण ५,७५,००० रुपये किं.च्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.  अपर पोलीस आयुक्त पु. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४,   चिलमुल्ला रजनिकांत, . पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन राजेंद्र पन्हाळे , .संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) श्री.अमर कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सुनिल उगले तपास पथक अधिकारी व पोलीस अंमलदार बबन वणवे, कृष्णा माचरे, यशवंत किर्वे, संपत भोसले,विशाल गाडे, वामन सावंत,संजय बादरे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे, प्रमोद जाधव यांचे पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या (Related News)

वाचक प्रतिक्रिया (Comments - 0)

या बातमीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवा!

आपली प्रतिक्रिया नोंदवा (Leave a Comment):

टीप: आपली प्रतिक्रिया संपादकांच्या मंजुरीनंतरच प्रकाशित होईल.