घर फोडी आणि चैन सन्याचिंग करणारा पाहिजे आरोपी विश्रामबाग पोलिसांच्या जाळ्यात.
महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : सतीश जाधव. : घरफोडी व चैन स्नॅचिंग सारख्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीने आंतरराज्यीय साथीदारांसह पुण्यात घरफोडी सारखे ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न ३७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने केले हस्तगत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे फिर्यादी हे घरात नसताना अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडुन चोरी केल्याने गुन्हा दखल करण्यात आला सदर गुन्हयाचा तपास करणे बाबत पो.निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे अधिकारी उमेश कारके, सहायक पोलीस निरीक्षक यांना आदेश केल्याने त्यांनी तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार मार्फतीने माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हे उंड्री पिसोळी येथील परिसरात आलेबाबतची माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, यांनी पो.निरीक्षक नवनाथ जगताप यांना सांगितली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्यास सांगितल्याने, बातमीच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, व पोलीस स्टाफ असे मिळुन उंड्री पिसोळी परिसर सर्व पिजुन काढला परुंतु आरोपी सराईत असल्याने त्यांची जागा सतत बदलत होते. आरोपी त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी गाडीमध्ये बसुन उंड्री पिसोळी येथील डोंगराच्या रोडने येत आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर स्टाफने नमुद गाडीला चारही बाजुने घेरावा घालुन एकत्रीत छापा करुन आरोपींना आहे त्या परिस्थीतमध्ये ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता शंकरसिंग ऊर्फ कुणालरसिंग जितेंद्रसिंग जुनी, वय २७ वर्षे, रा.स. नं. ११० कोठारी व्हील्सच्या पाठीमागे, रामटेकडी, हडपसर, पुणे,,रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर, वय २६ वर्षे, रा. अजवार रोड,एकता नगर बडोदा राज्य गुजरात, अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी, वय २२ वर्षे, रा.बिराजदार नगर हडपसर,पुणे, सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर/तीलपिटीया,वय २२ वर्षे, रा. अजवार रोड, एकता नगर, बडोदा राज्य गुजरात, असे सांगितल्याने त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता त्यांनी पुणे शहरातील एकुण ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते गुन्हे

