विदेशी दारुची चोरी करणा-या दोन आरोपींना केले जेरबंद..
महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त
पुणे : सतीश जाधव
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर विदेशी दारुची चोरी करणा-या दोन आरोपींना केले जेरबंद
वरिष्ठांनी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यास प्रतिबंध कार्यवाही करणेबाबत आदेशित केले होते. सदर सुचनेच्या अनुषंगाने दि.१८ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड तसेच पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यास प्रतिबंध करणे,अवैध शस्त्र बाळगणायांवर कारवाई करण्याबाबत, वाहन चोरीचे अनुषंगाने तसेच अवैध कृतींना आळा घालणेकरीता वरीष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. सुचनेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संदिप जायभाय,यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की जी.एस.टी. ऑफिसजवळ काही इसम संशयास्पदरित्या उभे आहेत व त्यांचे कड़े चोरीचे साहित्य असण्याची शक्यता आहे असे समजताच सदरची बातमी पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना कळविली असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या माहितीनुसार बातमीची खात्री करुन, सह्याद्री हॉस्पिटल कडुन जी.एस.टी. ऑफिसकडे जाणाया रोड मध्ये मोकळ्या जागेत दोन इसम थांबलेले दिसुन आले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याठिकाणी थांबण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचेकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारुच्या सहा बॉटल मिळुन आल्या. त्यांची नावे पत्ता विचारले असता त्यांनी नावे. रोहन राम कांबळे, वय २८ वर्ष, रा-बि विंग, फ्लॅट नं .१०७, प्रिस्टीन सिटी, बकोरी गाव, ता.हवेली, जि.पुणे, अमित महादेव सितापुरे, वय-२७ वर्ष. रा सिध्दार्थनगर,मच्छी मार्केट, येरवडा गाव, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडील विदेशी दारुच्या बाटल्यांबाबत त्यांना योग्य स्पष्टीकरण न देता आल्याने येरवडा पोलीस स्टेशन येथे आणुन चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडील विदेशी दारुच्या बॉटल या टॉनिक आऊटलेट, कल्याणीनगर येथील शॉपमधुन चोरल्या असल्याचे सांगितले. सदरच्या दारुच्या बॉटल या येरवडा पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील चोरीचा माल असल्याची कबुली दिली असुन सदर आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन एकुण २७,२०० रु. किमतीच्या सहा विदेशी दारुच्या बॉटल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड हे करत आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ पी .आर.पाटील, .सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन,. उमेश गिते, पोलीस निरीक्षक .केशव दिंडे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, बालाजी सोगे, संदिप जायभाय, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के , अनिल मन्हाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार, सोमनाथ गायकवाड यांनी केली आहे.

